•कल्याणच्या गांधारी नदीवरील पुलावरून केली आत्महत्या; दोन दिवसांनंतर मृतदेह आढळला
कल्याण :- बदलापूर येथील एका सुस्थितीत कुटुंबातील 44 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला मोबाईलवर भावनिक संवाद साधून कल्याणमधील गांधारी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह आढळला.
चित्रपटातील दृश्यासारखी घटना
धनाजी रघुनाथ शिंदे (वय 44), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बदलापूर पश्चिम येथील मेट्रो रेसिडेन्सी गृहसंकुलात कुटुंबासोबत राहत होते. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता त्यांनी पत्नी जयश्री शिंदे यांना मोबाईलवर संपर्क साधून, “मी आता घरी येणार नाही. मुलांना पाहून घे. मी आता आत्महत्या करत आहे,” असे सांगितले आणि तात्काळ मोबाईल बंद केला.
पतीने अचानक अशा प्रकारे बोलल्यामुळे भेदरलेल्या पत्नीने ही माहिती पतीच्या भावाला, तानाजी शिंदे यांना दिली. तांत्रिक माहितीच्या आधारे धनाजी यांचे लोकेशन शोधले असता, ते कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी नदी पुलाजवळ असल्याचे समजले.
मच्छिमाराने पाहिले दृश्य
शिंदे कुटुंबीयांनी त्या ठिकाणी शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. अखेर तानाजी शिंदे यांनी मच्छिमारांची मदत घेतली. एका मच्छिमाराने सांगितले की, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंगात सफेद सदरा, काळी विजार आणि पायात काळे बूट घातलेल्या एका व्यक्तीने पुलाच्या कठड्यावरून नदीत उडी मारली. त्या व्यक्तीने बचावासाठी कोणालाही संधी दिली नाही. या माहितीनंतर कुटुंबीयांना हा व्यक्ती धनाजी शिंदेच असल्याची खात्री पटली.
दोन दिवसांनंतर मृतदेह सापडला
पोलिसांना आणि अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर, गांधारी नदीच्या पुढील भागात, खाडी किनाऱ्यावर एक मृतदेह तरंगताना दिसला. मच्छिमाराच्या मदतीने बोटीने शोध घेतल्यानंतर तो मृतदेह धनाजी शिंदे यांचा असल्याचे निश्चित झाले.या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…