क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kalyan Suicide News रेबीजच्या भीतीपोटी बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; कल्याणमधील धक्कादायक घटना, सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

Kalyan Latest Bank Employee Suicide News : कुत्र्याने चावा घेतल्याची बाब कुटुंबापासून लपवली | उपचारांचा कोर्स पूर्ण न केल्याने जडले लक्षणे | ‘पाणी पाहून भीती वाटू लागली’ – तरुणाची शेवटची चिठ्ठी

कल्याण :- भटक्या कुत्र्यांचा हैदोस निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कल्याणच्या चक्की नाका परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने कुत्र्याने चावा घेतल्यावर उद्भवलेल्या रेबीजच्या लक्षणांमुळे गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबाला आपल्यामुळे त्रास होऊ नये, या भावनेतून या तरुणाने आपले जीवन संपवले. Kalyan Latest Suicide News

सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली वेदना

कोळशेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या घरी पोलीस तपासादरम्यान एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये त्याने नमूद केले की, “काही दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने माझ्या पायाचा चावा घेतला होता. कुटुंबाला काळजी वाटेल म्हणून मी ही गोष्ट घरी सांगितली नाही. मात्र, कालांतराने मला रेबीजची लक्षणे जाणवू लागली. मला पाणी पाहून भीती वाटू लागली आहे (Hydrophobia). ही लक्षणे वाढून भविष्यात माझ्यामुळे कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये, म्हणून मी स्वतःला संपवत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये.”

उपचारांकडे केले दुर्लक्ष

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, कुत्र्याने चावा घेतल्यानंतर या तरुणाने रेबीजविरोधी लसीचा केवळ एकच डोस घेतला होता. त्यानंतर त्याने पुढील आवश्यक डोस आणि उपचारांचा कोर्स पूर्ण केला नव्हता. रविवारी घरातील सदस्य गावी गेलेले असताना, त्याने संधी साधून राहत्या घरी आत्महत्या केली. रात्री घरचे लोक परत आल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

वैद्यकीय तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असून तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:

तात्काळ स्वच्छता: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास ती जखम तातडीने 10 ते 15 मिनिटे साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवावी.

उपचार पूर्ण करा: रेबीज हा वेळेत उपचार घेतल्यास 100% प्रतिबंधात्मक आजार आहे. लसीकरणाचा कोर्स अर्धवट सोडू नका.

लक्षणे दिसण्यापूर्वी लसीकरण

एकदा का रेबीजची लक्षणे (पाण्याची भीती, प्रकाश सहन न होणे) दिसू लागली की, त्यावर उपचार करणे कठीण होते. त्यामुळे चावा घेतल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांनी सांगितले की, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0