Kalyan Share Market News : सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन फसवणूक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावाच्या अमिषाला बळी
Kalyan Share Market Fraud News : ऑनलाइन फसवणूक ; सेवानिवृत्त व्यक्तीचे बँक खाते ऑनलाइन भुरट्यांनी केले खाली
कल्याण :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक Share Market Investment केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली सदाशिव टीकाराम चौधरी (62 वर्ष, रा. चिकनघर,कल्याण) या सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाला 29 लाख 30 हजारांचा गंडा सायबर Cyber Crime भामट्यांनी घातल्याचा प्रकार उघड झाला. माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा Share Market Fraud गुन्हा दाखल झाल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांनी दिली. Kalyan Crime News
ज्येष्ठ नागरिकाला whatsapp वर ऑनलाइन स्टॉक मार्केट Online Share Market Fraud मधील शेअर्स ॲनालयसीस करून शेअर्स आणि आयपीओ खरेदी-विक्री केल्यास अधिक परतावा मिळाण्याचे अमिष दाखविले. सदाशिव चौधरी यांना ऑनलाइन भुरट्यांनी GFSL Val Ed हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्याद्वारे शेअर्स व ipo खरेदी करण्याकरता तब्बल 29 लाख 30 हजार रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितली होते. ऑनलाइन गुंतवणूक केलेल्या पैसे कोणताही परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेच महात्मा फुले पोलीस ठाणे येथे ऑनलाइन फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली. चौधरी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड), 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नाईक हे करत आहे. Kalyan Crime News