Mumbai Police Operation:मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट मोहीम ; 7235 वाहनांची तपासणी

Mumbai Police All Out Operation : पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवार रात्री शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले
मुंबई :- पोलीस आयुक्त विवेक फणसळकर Mumbai CP Vivek Phansalkar व विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात Mumbai police Station ही कारवाई पार पाडली आहे.पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवार रात्री शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले. Mumbai Police All Out Operation या कारवाईत मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 192 ठिकाणांवर शोध मोहिम राबवण्यात आली. यावेळी शहरात नाकाबंदीदरम्यान 7235 वाहनांची तपासणी करण्यात आली.पहलगाम हल्ल्यानंतर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन राबवले.
5 प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व 13 परिमंडळ विभागांचे पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले. प्रत्येक पोलीस ठाण्यातून जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.
ऑलआउट अंतर्गत करण्यात आलेली कारवाई
– मुंबई पोलीसांच्या अभिलेखावरील तसेच फरार 10 आरोपींना अटक करण्यात आले आहे.- 30 जणांवर अजामीनपात्र वॉरंटसंदर्भात कारवाई करण्यात आली.
– अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणा-या, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकूण 19 जणांवर कारवाई करून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली..
– मुंबई शहराबाहेर हद्दपार केलेले, परंतु मुंबई शहरात ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान विना परवाना प्रवेश केलेल्या एकूण 40 तडीपार आरोपींवर मपोका. कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र (मुंबई ) पोलीस कायदयाचे कलम 120 व 122 अन्वये संशयितरित्या वावरणारे एकूण 64 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.-मुंबई शहरात एकूण 192 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील अनेक आरोपी तपासण्यात आले .- सर्व पोलीस ठाण्यांच्या हददीत एकूण 111 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.
– त्यात एकूण 7235 दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.- मोटारवाहन कायदयान्वये 1836 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
– कलम 185 मो.वा.का. अन्वये 63 मध्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.


