Kalyan Robbery News : महात्मा फुले पोलीस ठाणे यांची कारवाई ; दरोडाच्या तयारीत असणाऱ्या चार आरोपींना केले अटक, पोलिसांनी जप्त केले हत्यार
कल्याण :- महात्मा फुले पोलीस (Mahatma Phule Police) चौकीचे पोलीस उपनिरीक्षक वाघ आणि पोलीस हवालदार चौधरी यांना गोपनीय बातमीदाराच्या द्वारे मिळाले माहितीच्या आधारे 30 मे च्या मध्यरात्री काही लोक दरोडा टाकण्याच्या (Robbery plan) तयारीत आहे अशी बातमी मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दरोडाच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळल्या. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. Kalyan Crime News
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या पथकाने अनंत हलवाई दुकानाच्या गल्लीत झुंजारराव मार्केट येथे सापळा रचून चार आरोपींना अटक केली आहे. हे चार आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याजवळ चाकू,लोखंडी काटवणी, मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर हातोडा पक्कडक आणि फायटर असे प्राण घातक हत्यार त्यांच्याजवळ होते तसे त्यांच्याकडे रोख रक्कम ही होती असा सगळा ऐवज धरून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. Kalyan Crime News
आरोपी नाव
1) गोकुळ पंडीत सोनवणे, (37 वर्ष)रा.कल्याण पूर्व
2) उमेश बैजनाथ सिंग, (48वर्ष) रा.कल्याण रेल्वे स्टेशन फिरस्ता
3) बुखन कुमार श्रीगोना यादव, (20 वर्ष), रा.बदलापूर पश्चिम
4) मुशेद जायेद खान, (32 वर्ष)
रा. कल्याण रेल्वे स्टेशन फिरस्ता यांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, ते एस.टी.स्टॅण्ड व रेल्वे स्टेशन परिसरात दरोडा टाकण्याचे तयारीत असल्याचे समजले.प्रकारा़बाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुध्द गुन्हा भा.द.वि.कलम 399,402,398 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी क्र.1 ते 4 यांना अटक करण्यात आली आहे. एका फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करीत आहेत. Kalyan Crime News
Beware: 4 Accused Caught in Connection to Thane’s Robbery Planning
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…