•Kalyan Police Arrested Illegal Bangladeshi People : भारतीय वास्तव्याचा कोणताही पुरावा नाही; छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली
कल्याण :- कल्याण रेल्वे स्थानक Kalyan Railway परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सहा महिला आणि एका पुरुषासह सात बांग्लादेशी नागरिकांना महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या Mahtma Phule Police Station Kalyan पोलिसांनी अटक केली आहे. या सातही जणांकडे भारतात वास्तव्याचा कोणताही अधिकृत पुरावा आढळलेला नाही. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे, ज्यामुळे एक मोठी खळबळ उडाली आहे. Kalyan Latest Crime News
महिलांच्या संशयास्पद हालचालींवरून कारवाई
मंगळवारी महात्मा फुले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल भुजबळ त्यांच्या पथकासह कल्याण रेल्वे स्थानक भागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना सहा महिला संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. महिला हवालदार धनगर यांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. अधिक तपासणी केल्यावर त्या बांग्लादेशी असल्याचे स्पष्ट झाले.
या महिलांच्या मोबाईलमध्ये ‘इमो’ (imo) ॲप इन्स्टॉल होते आणि त्यांचे मोबाईल नंबर +88 या क्रमांकाने सुरू होणारे होते. चौकशीत त्यांनी भारतातून बांगलादेशात संवाद साधल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे बांगलादेशाचे जन्म प्रमाणपत्र आणि राष्ट्रीय ओळखपत्रही आढळले.
एका तरुणालाही अटक
याचदरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांना एक तरुणही संशयास्पद अवस्थेत आढळला. चौकशीत त्यानेही आपण बांगलादेशी असल्याचे सांगितले. त्याच्याकडे बांगलादेशातील रहिवासी असल्याचे कागदपत्र सापडले, परंतु भारतात राहण्याचा कोणताही कायदेशीर पुरावा नव्हता. त्यालाही पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार, या सातही जणांवर पारपत्र नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…