Kalyan Police Latest News : बारच्या आडून गैरप्रकार करणाऱ्यांवर मोहीम सुरूच राहणार” – उपायुक्त अतुल झेंडे
कल्याण | कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या बारधंद्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. Kalyan Police Satyam Bar Raid सत्यम बारवर टाकलेल्या छाप्यात अश्लील नृत्य सुरू असल्याचे उघड झाले असून, बारमधील एकूण ११३ जणांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात Kalyan Kolshewadi Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष पथकाकडून करण्यात आली. गेल्या वर्षभरात कल्याण, शिळफाटा, डोंबिवली, मलंग रोड परिसरातील बारवर पथकाचे छापे सुरूच आहेत. नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर आणि विशेष माहितीच्या आधारे रविवारी रात्री या बारवर धाड टाकण्यात आली.
छाप्यावेळी बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली. ग्राहक, महिला सेविका, व्यवस्थापक यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दोन्ही दरवाजे बंद करून सर्वांना ताब्यात घेतले.
बारमध्ये 41 महिला सेविका, 5 पुरुष कर्मचारी, 63 ग्राहक आणि मालक-व्यवस्थापक असा एकूण 113 जणांचा सहभाग होता. या सर्वांविरुद्ध अश्लील नृत्य व सार्वजनिक शांततेचा भंग यासारख्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. बारचे मालक आणि व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे म्हणाले की,बारच्या आडून अंमली पदार्थ, अश्लील नृत्य, महिला शोषण आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या व्यवहारांवर कायमस्वरूपी आळा घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त झेंडे यांनी दिली.
“ही मोहीम केवळ सुरूवात आहे, कल्याण-डोंबिवली परिसरातील अशा सर्व बारवर लक्ष ठेवले जात आहे आणि कारवाई थांबणार नाही,”
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…