मुंबईठाणे

Kalyan Police News : कल्याणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक

Assistant Police Inspector Sambhaji Deshmukh of Kalyan branch : उत्कृष्ट कामगिरीमुळे सन्मान; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरव

कल्याण :- पोलीस दलातील आपल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागाच्या कल्याण शाखेतील साहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले. ही कामगिरी देशमुख यांच्या अथक परिश्रम आणि निष्ठेची पोचपावती मानली जात आहे.

संभाजी देशमुख हे गुन्हेगारी तपास, गोपनीय माहिती मिळवणे आणि त्या आधारे तपास योग्य दिशेने नेण्यात निष्णांत मानले जातात. त्यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), आणि राज्य गुप्त वार्ता विभाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी काम केले आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

पोलीस दलातील नोकरीसोबतच देशमुख यांची सामाजिक कार्याप्रतीही असलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे. ते दुर्बल आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात. यापूर्वी, 2016 मध्ये त्यांना पहिल्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आले होते, तर 2018 मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले होते.

ठाणे शहर आयुक्तालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना, देशमुख यांनी अनेक सरकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांवरील लाचखोरीचे यशस्वी सापळे रचले होते. त्यांची ही कामगिरी नेहमीच कौतुकास्पद ठरली आहे. अचूक माहिती मिळवून तिचा पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी पोलीस दलासाठी नेहमीच मोलाची ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0