क्राईम न्यूजमुंबई
Trending

Kalyan Police News : महात्मा फुले चौकी पोलिसांची मोठी कामगिरी; चोरी, गहाळ झालेले 51 मोबाईल नागरिकांना केले परत

Kalyan Mahatma Phule Chowk Police Return Stolen Mobile Phone : महात्मा फुले चौक पोलिसांनी तब्बल 52 मोबाईल पुन्हा परत मिळविण्यात यश मिळविले. संबंधित नागरिकांना हे मोबाईल अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 अतुल झेंडे यांच्या हस्ते परत करण्यात आले.

कल्याण :- हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळण्याची शाश्वती कमी असताना महात्मा फुले पोलिसांनी तीन महिन्यात तब्बल 52 मोबाईल पुन्हा परत मिळविण्यात यश मिळविले. Kalyan Mahatma Phule Chowk Police संबंधित नागरिकांना हे मोबाईल अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 अतुल झेंडे यांच्या हस्ते परत करण्यात आले आहे.त्यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. Kalyan Police Latest News

कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरातील गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांकडून गहाळ झालेले तसेच चोरी गेलेल्या हे मोबाईल आहेत. महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्यानंतर अनेकदा तो परत मिळेल, याची खात्री नसते. तरीही नागरिक पोलिसांकडे याची तक्रार देतात. मोबाईल हरवल्यापेक्षा त्यामधील डेटा आणि इतर माहितीमुळे नागरिक हैराण असतात. त्याचा गैरवापर होऊ नये, अशी अपेक्षा असते. महात्मा फुले पोलिसांच्या सायबर कक्षाकडे मोबाईल चोरीला व गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. पोलीस शिपाई विजय कोळी यांनी सीईआय आर पोर्टलवर तक्रारी अपडेट करून तांत्रिक तपास करून हरवलेले मोबाइल हे महाराष्ट्रातील विविध ठिकाणात वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मोबाईलचा आयएमईआय नंबर, लोकेशन ट्रेस करण्यासह इतर तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी 5 लाख 88 हजार 500 रुपये किंमतीचे 52 मोबाइल शोधले. Kalyan Police Latest News

पोलीस पथक
ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय नाईक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोपान नांगरे, पोलीस निरीक्षक (प्रशासन), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक विकास मडके, पोलीस हवालदार चित्ते, पोलीस नाईक कांगरे, पोलीस शिपाई विजय कोळी, दिपक थोरात, श्रीधर वडगावे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0