महाराष्ट्र

Kalyan News : कल्याण बाजार समितीवर महायुतीचा झेंडा; सभापतीपदी घोडविंदे, उपसभापती पाटील बिनविरोध

Kalyan Mahayuti Latest News : 18 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय; आमदार किसन कथोरे यांच्या गटाची ठसठशीत कामगिरी

कल्याण | कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व प्रस्थापित करत पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. 18 जागांपैकी तब्बल 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून, सभापतीपदी आमदार किसन कथोरे यांचे निकटवर्तीय रवींद्र घोडविंदे, तर उपसभापतीपदी भाजपचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ही निवडणूक मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रमोद हिंदुराव यांनी प्रतिष्ठेची केली होती. याअंतर्गत महायुतीने विरोधातील निष्क्रिय आणि अंतर्गत कुरघोड्या करणाऱ्या गटांना चतुर रणनीतीने पराभूत करत सत्ता हस्तगत केली. निवडणुकीत काँग्रेसचा एक व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला.

बिनविरोध निवडीमुळे बाजार समितीवर महायुतीची स्पष्ट पकड निर्माण झाली आहे. घोडविंदे यांचा यापूर्वीचा कार्यकाळ विकासकामांनी ओळखला जातो. त्यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावले होते. याशिवाय, ते गोवेली येथील जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यात सातत्याने कार्यरत आहेत.

जालिंदर पाटील हे भाजपचे माजी नगरसेवक असून त्यांनी यापूर्वीही संचालक मंडळात काम केले आहे. बाजार समितीत प्रशासक राजवटीच्या काळात झालेल्या तक्रारी – नोकरभरती, भूखंड व्यवहार, पारदर्शकतेअभावी रोष – यामुळे लोकनियुक्त संचालक मंडळाची मागणी होत होती. ती अखेर पूर्ण झाली असून, शेतकरी, व्यापारी, अडते, ग्रामपंचायत प्रतिनिधी या सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0