क्राईम न्यूज

Kalyan News : कल्याण पोलिसांचा मोठा दणका! 35 किलो गांजा जप्त; तस्करांच्या आंतरराज्य टोळीवर ‘मकोका’ची कारवाई

Kalyan Latest Crime News : पोलीस हवालदाराला चिरडण्याचा केला होता प्रयत्न; ओडिशा ते महाराष्ट्र पसरलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

कल्याण | कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाणे Kalyan Mahatma Phule Police Station News आणि वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्य टोळीचा छडा लावला आहे. या टोळीतील 14 जणांपैकी 7 तस्करांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कल्याण परिमंडळात ‘मकोका’ लावलेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले. Kalyan Police Latest Crime News

थरारक पाठलाग आणि पोलिसावर हल्ल्याचा प्रयत्न ही घटना ऑगस्ट महिन्यात वालधुनी पुलावर घडली होती. छत्तीसगड पासिंगची एक संशयास्पद कार गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी आणि मिलिंद झोगडे यांच्या पथकाने सापळा रचला होता. संशयित कार दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला, मात्र चालकाने वेग वाढवून पळ काढला. हवालदार सोनवणे यांनी पाठलाग केला असता, चालकाने चक्क त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने कार अडवून त्यात असलेल्या पाच जणांना जागीच दबोचले.

मोठा साठा आणि घातक शस्त्रे जप्त या कारच्या झडतीमध्ये पोलिसांनी:

35 किलो गांजा (साडेआठ लाख रुपये किमतीचा)

एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे

छत्तीसगड आरटीओ पासिंगची मोटार

तपासातून रॅकेटचे जाळे उघड अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून या तस्करीचे धागेदोरे ओडिशा, नागपूर आणि भिवंडीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्यानंतर नागपूर आणि ओडिशामधून आणखी तिघांना अटक केली. ही टोळी ओडिशा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा खरेदी करून तो ठाणे, मुंबई, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरांत विकत होती. धक्कादायक म्हणजे या आरोपींविरुद्ध नागपूर शहरात अंमली पदार्थ तस्करीचे तब्बल 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

मकोका अंतर्गत कारवाई या टोळीचे गुन्हेगारी स्वरूप आणि संघटित व्यवहार पाहता, त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. सध्या सात आरोपी अटकेत असून उर्वरित सात जणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध राज्यांत रवाना झाली आहेत. सहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे आणि त्यांच्या टीमने ही धाडसी कारवाई पूर्ण केली.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago