Jain Mandir Robbery News : जैन मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक

•जैन मंदिरात देवाचे दागिने, चांदीचे मुकट, दानपेटीतील रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक
मुंबई :- मुंबई, शिवडी परिसरातील जैन मंदिरांच्या मध्ये 22 ते 23 एप्रिलच्या दरम्यान शिवडी जैन संघ, मूळ राजभवन एमडी मार्ग शिवडी येथे जैन मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली होती. या चोरीमध्ये चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून देवाच्या मूर्तीवरील दागिने, सोन्याची कपटी, चांदीचे मुकुट आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण सात लाख पंधरा हजार किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची तक्रार मंदिराचे पदाधिकारी विपिन छगनलाल यांनी दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून र.अ.की मार्क पोलीस ठाणे मुंबई येथे तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात 305 (अ),331(4) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना गुजरात राज्यातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवडी जैन संगमंदिर येथे 22 ते 23 एप्रिलच्या दरम्यान चोरी झाल्याच्या घटनेबाबत तक्रार करण्यात आली होती. या चोरीमध्ये अंदाजे 190 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 750 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण सात लाख पंधरा हजार रुपये किमतीचे चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच, चोरट्यांनी चोरीनंतर मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरा च्या वायरी कापल्या होत्या. या घटनेचे धार्मिक गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनेची तपासणी करण्यासाठी पोलिसांना मिळालेल्या डीव्हीआर मशीनच्या मदतीने तोंडाला हात रुमाल बांधून असल्याने आरोपीचे व्यवस्थित वर्णन होऊ शकत नव्हते. तसेच घटनास्थळापासून कॅमेरे बरेच अंतरावर असल्यामुळे आरोपीचे निष्पन्न करणे अवघड होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पासून येण्या जाणाऱ्या मार्गावरील तब्बल 29 ठिकाणावरील 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून तीन संशयित व्यक्तींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक आणि कौशल्य पूर्वक माहितीच्या आधारे तिन्ही आरोपींना गुजरात राज्यातील बनासकंठा जिल्ह्यातील भाकरमोटी गाव येथून अटक केली आहे.
अटक आरोपींची नावे
1.सुनीलसिंह सुरजसिंह दाभी, (वय 23)
2.राहुलसिंह प्रवीणसिंह वाघेला, (वय 20)
3.जिगरसिंह दिनेशसिंह वाघेला, (वय 19)
पोलीस पथक
पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्य नारायण, अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 आर रागसुधा, सहायक पोलीस आयुक्त माटुंगा विभाग योगेश गावडे यांचे मार्गदर्शनाखाली आर. ए.के. मार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप ऐदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, गोविंद खैरे, सहाय्यर फौजदार सुरेश घार्गे, पोलीस हवालदार अनिल कोळेकर, ज्ञानेश्वर केकाण, काशीनाथ शिवमत, कमलेश शेडगे, पोलीस शिपाई समिकांत म्हात्रे, किरण देशमुख, निखिल राणे, जितेंद्र परदेशी, गोविंद ठोके यांनी केली.



