मुंबई

Kalyan News : कल्याणमध्ये ‘ड्रग्स क्लीन अप ऑपरेशन’! एम.डी. आणि गांजासह तीन आरोपी अटकेत

•Kalyan Drugs Clean-Up Operation : 22 लाखांचा मेफेड्रॉन आणि किलोभर गांजा हस्तगत; विशेष कारवाई पथकाची मोठी मोहीम,फोर्टिस हॉस्पिटल, योगीधाम परिसरात धडक छापे – कल्याणचा अंमली रॅकेट उघड

कल्याण :- परिमंडळ-3 कल्याणच्या विशेष कारवाई पथकाने आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तीन आरोपींना अटक केली. या कारवायांतून एकूण 22 लाख रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) आणि सुमारे 25 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

फोर्टिसजवळ एम.डी.सह दोघे गजाआड
18 जुलै 2025 रोजी बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील फोर्टिस हॉस्पिटलच्या समोर, ए.पी.एम.सी मार्केटच्या पाठीमागील रस्त्यावर पोलिसांनी गस्तदरम्यान दोन इसमांना संशयास्पद स्थितीत ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपासणी केली असता 110 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आढळून आला, ज्याची अंदाजे किंमत 22 लाख इतकी आहे.

अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे

1.मोहम्मद कैफ मन्सुर शेख (24 वय), रा. बैलबाजार, कल्याण (प.)

2.फरदीन आसीफ शेख (24 वय), रा. कोनगांव, भिवंडी

या दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 22 (क), 29 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

योगीधाम परिसरात गांजा विक्रीचा प्रयत्न उधळला

या कारवाईच्या आधी, 17 जुलै रोजी खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील साई दर्शन ढाब्याजवळ, योगीधाम–अमृतधाम सोसायटी मार्गावर वालधुनी नदीच्या काठी गांजा विक्रीसाठी थांबलेला एक इसम पोलिसांच्या तावडीत सापडला.
त्याच्याकडे 1 किलो 120 ग्रॅम गांजा सापडला, ज्याची किंमत अंदाजे 25 हजार रूपये इतकी आहे.

अटक आरोपीचे नाव

रवि शिवाजी गवळी (30 वय), रा. अनुपमनगर, खडकपाडा, कल्याण (प.)

त्याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 20 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago