Kalyan News : मध्ये खुनाचा प्रयत्न, किरकोळ कारणावरून भांडण भांडणाचे रूपांतर हाणामारीत
Kalyan Crime News : किरकोळ कारणावरून भांडण होऊन छातीवर पोटावर चाकूने वार
कल्याण :- आमदार गणपत गायकवाड MLA Ganpat Gaikwad यांचा गोळीबार प्रकरण ताजी असतानाच कल्याणच्या गावदेवी गेट जवळ हाजीमलंग रोड वाद झाला. किरकोळ कारणांवरून हवा झाला असून त्यानंतर या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि भांडणात आरोपींना फिर्यादी याला पोटावर छातीवर चाकूने वार करून ठार मारण्याचे प्रयत्न केले आहे. Kalyan Crime News
गावदेवी गेट जवळ, हाजीमलंग रोड, कल्याण पूर्व येथे फिर्यादी राहुल दयानंद भोसले, (20 वर्षे) रा.कल्याण पूर्व व आरोपी 1) प्रविण ऊर्फ विकी मनोज दुबे, (31 वर्षे) र2) सिध्दार्थ ऊर्फ सिध्दया प्रल्हाद साळवे, (24 वर्षे) 3) राकेश ऊर्फ फंटर अशोक शर्मा, (29 वर्षे), रा.शास्त्रीनगर, कल्याण पूर्व व इतर दोन इसम यांचेत किरकोळ कारणावरून भांडण होवुन त्या भांडणाचा आरोपीत यांनी राग मनात धरून, आपसांत संगनमत करून चाकुने फिर्यादी यांचे हातावर, छातीवर, पोटावर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आली आहे. भा.द.वि.कलम 307,341,323,504,506,34,120(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तीन आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके हे करीत आहेत. Kalyan Crime News