क्राईम न्यूज

कल्याण : केडीएमसीचा लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात

Kalyan ACB Thane Trap News : तडजाेडीअंती 1.5 लाखांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत तक्रारदाराने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भ्रष्ट लिपिकाचा चेहरा समोर आला आहे. KDMC Bribe News कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील तक्रारदार यांचे मटन विक्री व कटाच्या परवाना हस्तांतरित करण्याकरिता लिपिक याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. Two Lakh Bribe In KDMC तडजोडीअंती ही रक्कम एक लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी भ्रष्ट लिपिकाला अटक केली आहे. प्रकाश काशिनाथ धिवर (56 वय) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाजार आणि परवाना विभागात लिपिक म्हणून काम करत आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीला तक्रारदार यांनी ठाणे एसीबी कार्यालयात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लिपिक अधिकाऱ्याने लाच मागितल्या बाबत तक्रार दाखल केली होती. प्राथमिक माहितीनुसार तक्रारदार यांचे मटन विक्रीचे दुकान आहे. मटन विक्रीचा परवाना हस्तांतरित करण्यासाठी अर्ज स्वीकृत करण्यासाठी आणि परवाना हस्तांतर करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम 1 लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. एसीबीला मिळालेल्या माहितीनंतर 31 जानेवारी दरम्यान महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे,संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे,सुहास शिंदे अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष अंबिके, पोलीस निरीक्षक एसीबी ठाणे यांच्या पथकाने कारवाई करत महानगरपालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्याला बेड्या ठोकले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago