कल्याण : परिमंडळ-३ कल्याण पोलिसांनी आंतरराज्य गांजा तस्करीची साखळी उघडकीस आणत तब्बल १३ आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ११५ किलो गांजा, पिस्तूल, जिवंत काडतुसे, वॉकी-टॉकी संच, मोटारकार, ऑटो रिक्षा, दुचाकी वाहने आणि रोख रक्कम मिळून सुमारे ७० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली शहर परिसरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या पेडलर्सविरोधात २ ऑगस्ट रोजी खडकपाडा पोलीस ठाणे व विशेष पथकाने कारवाई केली होती. आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातून तिघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
तपासदरम्यान आरोपींचे धागेदोरे महाराष्ट्रातील कल्याण, बदलापूर, ठाणे, सोलापूर जिल्ह्यासह आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपर्यंत पोहोचले. पोलिसांनी मिळालेल्या माहिती व पुराव्यांच्या आधारे विविध ठिकाणी छापे घालून १३ आरोपींना जेरबंद केले.
जप्त मुद्देमाल :
११५ किलो गांजा (किंमत ₹२८.७५ लाख)
एक पिस्तूल व २ जिवंत काडतुसे
२ वॉकी-टॉकी संच
२ मोटारकार, १ ऑटो रिक्षा, १ बुलेट, १ अॅक्टीव्हा
रोख रक्कम
एकूण जप्तीची किंमत ₹७०,०३,००० इतकी आहे. तपासात आरोपी आंध्र प्रदेशातील जंगल परिसरात गांजाची वाहतूक करताना परस्पर संपर्कासाठी वॉकी-टॉकीचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपींची नावे : बाबर उस्मान शेख, गुफरान हनान शेख, सुनिल मोहन राठोड, आझाद अब्दुल शेख, रेश्मा अल्लावुद्दीन शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, सोनु हबीब सय्यद, आसिफ अहमद शेख, प्रथमेश नलवडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे, योगेश जोध.
या पैकी सहा आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.
यातील आरोपी क्र. ६, क्र.९ ते क्र. १३ असे एकूण ०६ आरोपी हे सद्या पोलीस कोठडी मध्ये आहे.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह. पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग संजय जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-३ अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा पोलीस ठाणे डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या देखरेखीखालील पथकाने ही कारवाई केली.
या पथकात पो.नि. मारूती आंधळे, पो.नि. साबाजी नाईक, स.पो.नि. अनिल गायकवाड, स.पो.नि. विजय गायकवाड, स.पो.नि. संदीप भालेराव, पो.उपनि. जितेंद्र ठोके, पो.हवा. सदाशिव देवरे, राजु लोखंडे, संदीप भोईर, योगेश बुधकर, निसार पिंजारी, पो.शि. सुरज खंडाळे, अनिल खरसान, राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, कांतीलाल वारघडे, अनंत देसले, सुरेश खंडाळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…