Kalyan Drug Connection : कल्याण स्थानकात ‘ड्रग्ज कनेक्शन’ उघड! प्रवाशाच्या पिशवीतून उघड झाला 8 किलो गांजाचा स्फोट

Kalyan – Gujrat Drug Connection Racket Busted : गुजरातहून आलेला ‘तस्कर’ अटकेत; लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी उधळली
कल्याण :- कल्याण रेल्वे Kalyan Railway Station स्थानकावर सोमवारी दुपारी एक मोठी घडामोड घडली. फलाट क्रमांक सातवर संशयास्पदपणे फिरणाऱ्या एका प्रवाशावर सुरक्षा जवानांनी लक्ष केंद्रित करत तपासणी केली असता, त्याच्या पिशवीतून तब्बल 8 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ सापडला. Kalyan – Gujrat Drug Connection Racket Busted
फलाटावर संशयास्पद हालचाली; सुरक्षा जवानांच्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थ सापडले
सदर प्रवाशाचे नाव नरेशकुमार मनोहरभाई पंचोली (34 वय, राहणार – गुजरात) असे असून, तो कोणतीही ट्रेन न पकडता प्लॅटफॉर्मवर रेंगाळत असल्याने जवानांना संशय आला. पोलिसांच्या चौकशीत तो गोंधळला आणि तपासणीदरम्यान त्याच्याकडील पिशवीतून गांजाचा मोठा साठा उघड झाला.
कल्याण रेल्वे स्थानकातून देशभर गाड्या सुटत असल्याने तस्करीसाठी ही जागा निवडली गेल्याची शक्यता आहे. या कारवाईत लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्तपणे मोठा साखळी खोडून काढल्याचे मानले जात आहे.
ही धाडसी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.



