मुंबई

Kalyan-Dombivli Election Update : कल्याण-डोंबिवलीत महायुतीत ‘खुल्लम खुल्ला’ वाद; शिंदे गटाकडून भाजपला थेट आव्हान

• ‘येणार असाल तर तुमच्यासह या, अन्यथा आडवे करू’: शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा

कल्याण-डोंबिवली :- आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘विकास हवा असेल तर यावेळी भाजपचाच महापौर बसला पाहिजे’ असे निर्देश देऊन तयारी सुरू केली असतानाच, शिंदे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.

अरविंद मोरे यांचा कडक इशारा

कल्याणमधील एका छोटेखानी कार्यक्रमात बोलताना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी अत्यंत वादग्रस्त आणि आक्रमक विधान केले. महापालिका निवडणुकीसाठी युती होईल की नाही, हा नंतरचा भाग आहे, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपला उद्देशून म्हटले, “येणार असाल तर तुमच्यासह या, अन्यथा तुम्हाला आडवे केल्याशिवाय राहणार नाही.”

मोरे यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीसह भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. वादग्रस्त विधानांसाठी परिचित असलेल्या मोरे यांनी भाजपला थेट आव्हान देत म्हटले, “आमच्याशिवाय विजयी होऊ शकतो, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी खुलेपणाने पालिका निवडणुका लढवून दाखवाव्यात. आम्ही ते आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत.”

पडद्यामागे ‘काटाकाटी’ सुरू

कल्याण-डोंबिवलीमध्ये वरून सख्य दिसत असले तरी, भाजप आणि शिंदे शिवसेनेत पडद्याआड तीव्र संघर्ष सुरू आहे. पालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी आपापले नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुसऱ्या गटाकडून आपल्याकडे ओढण्याची ‘पतंगीच्या काटाकाटी’प्रमाणे सुप्त तयारी सुरू केली आहे.

भाजपला कोणत्याही परिस्थितीत महापौरपदावर आपलाच उमेदवार हवा आहे, तर शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे की, “प्रत्येक प्रभागातून शिंदे शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल यासाठी ताकद लावा आणि पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा.”

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago