क्राईम न्यूज

kalyan Crime News : उल्हासनगर,कल्याण-डोंबिवलीत ऑनलाईन विन गेम (Win Game) लॉटरीचा मुद्दा अधिवेशनात गाजणार?

Kalyan Dombivli Illegal Online Win Game lottery : बेकायदा ॲपद्वारे लॉटरी माफियांकडून खेळणाऱ्यांची फसवणूक; कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडीत, अधिवेशनात ऑनलाईन लॉटरी, जुगार अड्ड्यात बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई बाबत उत्तर देणार का?

कल्याण :- राज्य सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मुद्द्यांनी वादळ उठवले आहे. एकीकडे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाकडून त्यांच्या शिक्षेबाबत मिळालेल्या दिलासा. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद या सगळ्या गोष्टींमुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. परंतु, या अधिवेशनात बेकायदेशीर जुगार अड्डा, ऑनलाईन लॉटरी, लोकांचे होणारे फसवणूक यांसारख्या मुद्द्यावर सरकार उत्तर देणार का? या बेकायदेशीर धंद्यांवर तसेच धंदे चालवणाऱ्यांवर सरकारकडून कारवाई? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. Kalyan Dombivli Illegal Online Win Game lottery ऑनलाईन विन गेम (Win Game) ॲप द्वारे खेळण्यात येणाऱ्या लॉटरीतुन कोट्यावधीचा महसूल बुडवला जात तर आहेच उलट लोकांची फसवणूक होत आहे. यावर शासन कठोर पावले उचलणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. तसेच, उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या बाल किल्ल्यातच यांसारख्या अवैध लॉटरीचा फैलावत आहे.

नेमका काय प्रकार आहे?

उद्योग व्यापार, औद्योगिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक नगरी अशी ओळख असलेल्या उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या शहराला सद्या ऑनलाईन लॉटरीचा शिरकाव झाला आहे. काही लॉटरी माफियांनी स्वतःचा ॲप तयार करून ऑनलाईनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लॉटरीचा गोरख धंदा सुरू केला आहे. Illegal Online Win Game lottery या बदमाशांकडून एकीकडे सरकारचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवला जात आहे. तर दुसरीकडे लॉटरीच्या माध्यमातून केवळ माफियांनाच फायदा होत असल्याने लॉटरी खेळणारी अनेक कुटुंब देशोधडीला लागत चालली आहेत. परंतु सरकारच्या ऑनलाईन बेकायदा धंद्यावर नजर असतानाही या ऑनलाईन लॉटरीसाठी सरकारने डोळ्यावर काळीफित बांधली असून पोलीस प्रशासनाला ऑनलाईन भुरळ घातल्याची पाहायला मिळत आहे. विन गेम (Win Game) नावाच्या लॉटरीने कल्याण उल्हासनगर डोंबिवली अशा परिसरात धुमाकळत झालेल्या असून शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत मोठ्या प्रमाणावर लॉटरी खेळली जात आहे.

तथापी लॉटरी जुगाराच्या आहारी गेलेल्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे कल्याण-डोंबिवलीत पसरत चाललेल्या ऑनलाईन लॉटरीच्या गोरख धंद्यांतून दिसून येते.
जवळपास कल्याण डोंबिवली उल्हासनगर परिसरात 50 पेक्षा अधिक यांचे लॉटरी सेंटर असून शिरसाट नावाच्या व्यक्तीचा या धंद्यावर वर्चस्व आहे .नागपूर येथील राजेश नावाच्या व्यक्तीकडून संपूर्ण सॉफ्टवेअर पाहिले जाते. तसेच शंकर अहुजा नावाच्या व्यक्तीकडून स्थानिक प्रशासकीय गुंडाना‌ हाताशी धरून हा धंदा अतिशय जोरात आणि जोमात चालू असल्याचे विश्वासनीय सूत्राने माहिती दिली आहे. तन्ना नावाच्या व्यक्तीकडून संपूर्ण धंद्याबाबत लायसनिंग केली जाते. म्हणजेच लोकल भाई,पोलीस, वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना चिरीमिरी करता मॅनेज करून या धंद्यांना अभय दिले जाते असा प्रकार या विन गेम लॉटरीच्या माध्यमातून सध्या कल्याण आजूबाजूच्या परिसरात जोर धरत आहे.

ॲप तयार करून त्याद्वारे ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आहे. शासनाचे त्यामुळे कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. ऑनलाईन सेंटरची पोलिस यंत्रणेसह शासनाच्या संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.याकडे गंभीर समस्येकडे स्थानिक पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाया कराव्यात, बेकायदेशीरपणे नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन सेंटर्सवर कारवाया कराव्यात, अशी मागणी होत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago