कल्याण : कल्याण पूर्व येथील वालधुनी परिसरात झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करत महात्मा फुले चौक पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने व अन्य मुद्देमाल मिळून तब्बल ₹२४.२० लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
दि. १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.१५ ते ४.३० या वेळेत अज्ञात चोरट्याने वालधुनी येथील घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम व किचनमधील कपाटाचे लॉक तोडून सोने-चांदीचे दागिने व इतर वस्तू असा सुमारे ₹१२.६९ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी गु. र. नं. ४१५/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३३१(३), ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोणतेही ठोस धागेदोरे नसतानाही पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून आरोपी काळ्या-लाल रंगाच्या स्कुटीवरून आले असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात आरोपी नालासोपारा परिसरात गेल्याचे निष्पन्न झाले. अखेर तपास पथकाने साजीद अकबर शेख (वय ३४) यास ८ ऑगस्ट रोजी अटक केली. पुढे तपासात चोरीचा माल विल्हेवाट लावणारे ऋषीकेश चौधरी व प्रीती कदम या दोघांनाही अटक करण्यात आली. मात्र या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सावेज शेख अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
तपासादरम्यान महात्मा फुले चौक पो.स्टे. गु.रजि. नं. ४१२/२०२५ मधील आणखी एक घरफोडी प्रकरण देखील उघडकीस आले.
हस्तगत मुद्देमाल :
सोन्याच्या लगड्या – एकूण वजन अंदाजे १००.०१० ग्रॅम (किंमत ₹१६.५० लाख)
चांदी अंदाजे १ किलो, त्यात ११ वस्तू, कॉईन व चांदीची वीट (किंमत ₹७.३० लाख)
आणखी एका प्रकरणात ८.०६० ग्रॅम सोनं (किंमत ₹६०,०००)
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत : ₹२४,२०,०००
ही कारवाई पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, पोनि विजय नाईक, सपोनि स्वप्नील भुजबळ व त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार साळुंखे, तडवी, कॉन्स्टेबल वडगावे, कोळी, जाधव यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि स्वप्नील भुजबळ करत आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…