Kalyan Crime News : कल्याण मध्ये चोरी ; भामट्याने तीन लाखाहून अधिक किंमतीचे दागिने केले लंपास
•Kalyan Crime News कल्याण मध्ये चोरी चोरट्याने घरातील बेड मध्ये ठेवलेले दागिने लंपास
कल्याण :- खडेगोलवली परिसरात राहणारे सुभाष पंढरीनाथ भामरे (66 वर्ष) कामानिमित्त 11 मे रोजी बाहेर गेले असता त्यांच्या घरात कोण नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने सायंकाळी पाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजल्याच्या दरम्यान घराच्या खिडकीच्या ग्रील तोडून आत प्रवेश करून घरात ठेवलेल्या बेड मध्ये ठेवलेले तीन लाख 56 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. घरात झालेल्या चोरी बाबत भामरे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
कल्याण मधील गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांकडून सातत्याने कठोर पावले उचलले जात आहे. पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगारांना सातत्याने अटक करून त्यांना समन्स बजावले आहे.समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणार नाही याची हमी घेतली जाते. या गोष्टी घडत असतानाही कोळसेवाडीत चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. भामरे यांच्या घरातील चोरीच्या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्याने भामरे यांच्या घरातील बेडमध्ये ठेवलेले जवळपास तीन लाख 56 हजार किमतीचे सोन्याचे दागिने आपल्या सोबत लंपास केल्याची घटना घडली आहे. भामरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कलम 454 457 380 प्रमाणे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे हे करत आहे.