Kalyan Crime News : मोबाईल शॉपमध्ये चोरी, लाखो रुपयांचे मोबाईल चोरट्यांकडून लंपास
•कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, यश मोबाईल दुकानात 8.13 लाख रुपयांचे मोबाईल चोरीला
कल्याण :- कोनगाव येथील यश मोबाईल दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मोबाईल दुकानातील तब्बल 8.13 लाखाचे मोबाईल चोरी केली आहे. आरोपींच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमोल ताराचंद परदेशी (34 वर्ष) यांचे कोनगाव येथे यश मोबाईल शॉप हे मोबाईलचे दुकान आहे. 28 जुलै च्या पहाटेच्या दरम्यान त्यांच्या दुकानातील उजव्या बाजूची भिंत तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. दुकानातील एकूण 8 लाख 13 हजार 209 रुपये किंमतीचे मोबाईल फोन चोरट्यांनी लंपास केले आहे. या घटनेबाबत फिर्यादी परदेशी यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवि कलम 305,331 (3),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.आर.सकपाळ हे करत आहे.