Kalyan Crime News : कल्याणच्या आधारवाडी परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 तरुणींची सुटका

•कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी लालचौकी परिसरातील अनुभव हॉटेलच्या जवळ मोठी कारवाई करून 4 तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. या प्रकरणी तीन दलालांना अटक झाली असून त्यात दोन महिला आहेत
कल्याण :- कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग, ठाणे क्राइम ब्रांच यांनी कल्याणच्या आधारवाडी परिसरात असलेल्या अनुभव हॉटेल जवळ मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग ठाणे पोलिसांनी कल्याण आधारवाडी परिसरात छापा टाकला आहे. तसेच पोलिसांनी वेश्या व्यवसायाला भाग पाडणाऱ्या 3 दलालांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या 3 दलालांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध, ठाणे क्राईम ब्रँचे पोलीस सखोल तपास करत आहेत.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदरवाडी रोड येथील लालचौकी परिसरात असलेल्या हॉटेल अनुभव याजवळ दोन महिला आणि पुरुष वेश्याव्यवसायिक करत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच या तिघही वेश्या दलालाकडून पुरुष ग्राहकांना द्या व्यापारासाठी मुली पुरवत असल्याची माहिती मिळाली होती तसेच ग्राहकांना व्हाट्सअप द्वारे मुलींचे फोटो पाठवून शरीर संबंधासाठी मुली पुरवत असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी बोगस ग्राहकांच्या मदतीने या वेश्या दलाल करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार पिडीत तरुणींचे पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित चारही तरुणींना सुधार गृहात पाठवण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ही कारवाई चेतना चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ठाणे, पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही.चव्हाण, स्नेहल शिंदे, पोलीस हवालदार राजेश सुवारे, विजय पाटील, के बी पाटील, पोलीस अंबलदार विजय यादव, उदय घाडगे आणि महिला पोलीस अंमलदार पूनम खरात यांनी कारवाई केली आहे.