•ऑनलाइन टास्कचा बळी, पाच लाखहून अधिक फसवणूक, महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कल्याण :- सायबर विभागाकडून सातत्याने ऑनलाइन फसवणुकीबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. तरीही काही लोक कळत नकळत ऑनलाइन फसवणुकीचे शिकार होत आहे. अशीच घटना कल्याणच्या संतोषी माता रोड येथे राहणाऱ्या सेवानिवृत्ती राजेंद्र दत्तात्रय सोनावणे (60 वर्ष), यांच्यासोबत घडलेली आहे.
फिर्यादी राजेंद्र सोनवणे, यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने टेलिग्राम ॲपमधील 8709 HCL SOFTWARE TASK GROUP या ग्रुपमध्ये ॲड केले. त्यानंतर आरोपी याने फिर्यादी यांना क्रिप्टो करन्सीचे चार टास्क पाठवून ते पुर्ण करणेकरिता एकुण 5 लाख 11 हजार 500 रूपये ही रक्कम त्याचे विविध बँक खातेवर ऑनलाईन ट्रान्सफर करणेस सांगुन ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लांडगे हे करीत आहेत.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…