Kalyan Crime News : टेलिग्राम वरून ऑनलाईन फसवणूक, फोटो आणि व्हिडिओ लाईक करणे पडले महागात
• Don’t Get Caught in Telegram’s Web : An Online Financial Trap ऑनलाइन आर्थिक फसवणूक, टेलिग्राम ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास लाखो रुपयांची आमिष
कल्याण :- टेलिग्राम वरून नोकरीच्या आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. टेलिग्राम ॲपवरून व्हिडिओ आणि फोटो लाईक करण्याचे तरुणाला टास्क दिले होते.तरुणाचा विश्वास संपादन करण्याकरिता ऑनलाईन भुरट्यांनी सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याबद्दल 1620 रुपये दिले होते. त्यानंतर जवळपास पाच लाख रुपयाचे तरुणाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणचा मुरबाड रोड परिसरात राहणाऱ्या श्रेयस गुरुनात खुळे (25 वर्ष) त्याला अज्ञात व्यक्तीने आणि महिलेने कॉल करून टेलिग्राम वर फोटो, व्हिडिओ लाईक केल्याचे टास्क दिले. त्या बदल्यात चांगले पैसे मिळेल असे आमिष हि दाखविले. सुरुवातीला तरुणाचा विश्वास संपादन करण्याकरिता ऑनलाइन टास्क पूर्ण केल्याबद्दल 1620 रुपयांचा मोबदला दिला. तसेच पुढील टास्क पूर्ण करण्यासाठी आरोपींनी त्याच्याकडून वेगवेगळ्या बँक खातेतून 4.99 लाख रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. From Likes to Losses: The Dark Side of Online Tasks on Telegram परंतु अनेक कालावधी होऊन कोणत्याही प्रकारे ऑनलाईन रक्कम परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झालेली लक्षात येताच त्याने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्रेयस याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66(ड),66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे नाईक हे करत आहे.