Kalyan Crime News : ऑनलाइन फसवणूक ; क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक फसवणूक
Kalyan Crime News:- सावधान.. सावधान..(https://t.me/Lakshmi_ainiyibeizi20) अशी लिंक ओपन करू नका अन्यथा आर्थिक बळी जाणार
कल्याण :- ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना कल्याण मध्ये समोर आली आहे.फिर्यादी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी यांनी आर्थिक आमिष दाखवून क्रिप्टो करन्सी संदर्भात टास्क पूर्ण केल्यास आर्थिक नफा मिळेल अशा आमिषाला बळी पडत सहा लाखाहून अधिक किमतीची फसवणूक झाल्याची घटना कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. पोलिसांकडून सावधान गिरी बाळगल्याने सांगितले असून कोणीही अशा प्रकारची (https://t.me/Lakshmi_ainiyibeizi20) लिंक ओपन करून त्यामध्ये पैसे गुंतवणूक करू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सहा लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक
विजय त्रंबक शेटे (43 वर्ष) कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या हद्दीत राहत असून त्यांना मोबाईलवर अशा प्रकारची लिंक आली त्या लिंक ला सबस्क्राईब केले असता फिर्यादी याच्या खात्यावर दीडशे रुपये आले त्यानंतर त्यांना telegram च्या माध्यमातून पाठवलेले दुसरे लिंक सबस्क्राईब करण्यास सांगितले आणि त्यामध्ये म्हणजे क्रिप्टो करन्सी संदर्भात टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे आम्हीच दाखविले होते. त्यांनी विश्वास ठेव सहा लाख 47 हजार 800 रुपये एवढी रक्कम इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे फिर्यादी व त्याचे पत्नी यांच्या खात्यातून वेगवेगळ्या खात्यावर पाठवण्यात भाग पाडले. गुंतविलेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारे आर्थिक मोबदला न मिळाल्याने आपले आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवि कलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क),66 (ड) गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. सी. शिंदे हे करत आहे.