Kalyan Crime News : ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केट आणि ट्रेडिंगच्या नादात 37 लाख रुपयांचा आर्थिक गंडा
•Kalyan Crime News शेअर मार्केट आणि ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळेल या आशेने तब्बल 37 लाखाचा गंडा घातल्याचे घटना कल्याणमध्ये समोर आली आहे
कल्याण :- शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्याची घटना कल्याण मध्ये समोर आली आहे. यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल या अशाने तब्बल 37 लाख 17 हजार रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून फसवणूक झाल्याची घटना कल्याण मध्ये समोर आली आहे.
संदीप शंकर गोडे (34 वर्ष), कल्याणच्या लोक ग्रामपंचायत राहणाऱ्या यांना अनोळखी व्यक्तीने टेलिग्राम ग्रुप मध्ये ऍड केले तसे त्यांनी आपल्या स्वाती दराच्या ग्रुप मध्ये ऍड करून शेअर मार्केट आणि ट्रेडिंग बाबत माहिती दिली शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल अशी अशा दाखविले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्याकरिता त्यांनी काही रुपये गुंतवले होते त्यावर परतावा चांगला दिला असा विश्वास संपादन करून गोडे यांना बी एस गोल्ड हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या ॲप मध्ये सुरुवातीला त्याचा विश्वास संपादन करण्याकरिता शेअर खरेदी विक्री करण्या स सांगून अधिक नफा देऊन विश्वास संपादन केला. त्यांनी आतापर्यंत 37 लाख 17 हजार 184 रुपये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगितले होते. एवढी मोठी रक्कम गुंतवणूक करून कोणत्याही प्रकारे आर्थिक परतावांना मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोडे यांनी आर्थिक फसवणुकीबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) 66 (ड) प्रमाणे भा द वि कलम 420,406,34 सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचा पुढील तपास वरिष्ठ गुन्हयातील पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम हे करत आहे.