Kalyan Crime News : कल्याण महात्मा फुले पोलिसांची कारवाई ; 3 गुन्ह्यांची उकल,एका चोरट्याला अटक
Kalyan Police Arrested Robbers : सराईत चोरी करणाऱ्या एका आरोपीला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवरील तीन घरफोडी गुन्हे उघडकीस आणले आहे. तसेच आरोपीवर यापूर्वी सहा गुन्हे दाखल असून पोलिसांनी दोन अल्पवयीन गुन्हेगारांनाही अटक केली आहे
कल्याण :– कल्याण महात्मा फुले पोलिसांच्या Kalyan Mahatma Phule Police Station हद्दीत काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढत आहेत. पोलिसांनी अशाच एका घरफोडी करून चोरी Kalyan Robbery News करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. चोरट्याकडून पोलिसांनी Kalyan Police Station 81 हजार 680 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपीचे 3 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांनी यश आले आहे. Kalyan Latest Crime News
कल्याण परिसरात चैन मोबाईल स्नेचिंग ,बाईक चोरी ,बॅग लिफ्टिंग, घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या .हे गुन्हे रोखण्यासाठी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आरोपींना अटक करण्यासाठी कल्याण महात्मा पोलिसांच्या पथकाने जंग जंग पछाडले होते . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 ऑक्टोबरच्या दरम्यान कमलेश अशोक अहिरे यांच्या कल्याण पश्चिमेला रितेश आपारमेंट येथे असलेल्या गोडाऊन मध्ये चोरी झाली होती. या चोरीची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. चोरीमध्ये चोरट्यांनी टीव्ही, मॉनिटर, घड्याळ,गॅस शेगडी, स्पीकर असा एकूण 38 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करून घेऊन गेले. या प्रकरणी पोलिसांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331(3),331(4),305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Kalyan Latest Crime News
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार केले होते. तपास पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे सापळा रचून कल्याण पश्चिमच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या विकास ज्ञानेश्वर टेमघरे (22 वय, रा. शिव मंदिर जवळ , इंदिरानगर कल्याण ) आणि त्यांच्या सोबत गुन्हा करणाऱ्या दोन अल्पवयीन बाल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकासाच्या विरोधातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. तर विकासवय यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जे जे चौधरी हे करत आहे. पोलिसांनी आरोपीकडून 81,680 रुपये किंमतीचा मुद्देवाल हस्तगत केला आहे. Kalyan Latest Crime News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3 अतुल डोडे, सहायक पोलीस आयुक्त, सुर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघ, पोलीस हवालदार जितेंद्र चौधरी, मनोहर चित्ते, पोलीस नाईक आनंद कांगरे, किशोर सुर्यवंशी, पोलीस शिपाई दिपक थोरात यांनी केली आहे