Kalyan Crime News : किरकोळ कारणावरून हत्या, रस्त्यावरून जाण्यास हटकल्याने वाद
कल्याण :- कल्याण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्मार्ट सिटी kalyan Smart City अंतर्गत रात्रीच्या वेळेस कामे चालू असतात. या कामादरम्यान अनेक वेळा मार्गांमध्ये बदल करण्यात येतो. स्मार्ट सिटी अंतर्गत काम चालणाऱ्या रेल्वे स्टेशन Kalyan Railway Station परिसरात दोन सेक्युरिटी गार्डने एका प्रवाशाला रस्त्यावरून जाण्यास हटकल्याने वाद निर्माण झाला. या वादातून प्रवासी आणि सेक्युरिटी गार्ड यांचा वाद विकोपाला गेला. या वादात रस्त्याने जाणाऱ्याला डोक्याला मार लागून तो मृत्युमुखी पडला. Kalyan Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काल (28 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या दरम्यान राहत मेडिकल, दीक्षा हॉटेलसमोर, कल्याण रेल्वेस्टेशन येथे राजकुमार विनोद यादव (वय 37 वर्ष रा. राणीगज, पश्चिम बंगाल) यास राहुल शिंदे (रा.बिर्ला कॉलेज) व विजय डांगे, (रा.आंबिवली) सिक्युरिटी गार्ड यांनी स्मार्ट सिटीचे बांधकाम चालु असल्यामुळे त्या रस्तावरून जाण्यास हटकल्याने त्याचेत वाद झाला.सदर वादामध्ये एकमेकांना मारहाण होवुन राजकुमार विनोद यादव सेक्युरिटी गार्ड यांनी त्यास उचलून खाली आपटले .त्यामुळे त्याचे डोक्यास मुक्का मार लागल्याने त्यास रूक्मीणीबाई शासकीय हाॅस्पीटल येथे दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे. सदरबाबत घटनास्थळावरून राहत मेडीकल मध्ये CCTV फुटेज प्राप्त आहेत. आरोपींबाबत माहीती हस्तगत करून आरोपी यास तत्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करून पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन करीत आहेत. Kalyan Latest Crime News