Kalyan Crime News : महिलेच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम लंपास
•कल्याणमध्ये महिलेच्या घरी चोरी,चोरी मध्ये चार लाख वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास
कल्याण :- कल्याणच्या आडिवली परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेच्या घरात चोरी झाली आहे. या महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण चार लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. महिलेने घडलेल्या प्रकरणाबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व आडिवली परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेच्या घरात रात्रीच्या दरम्यान चोरी झाली आहे. चोरट्यांनी किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख वीस हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. महिलेने घडलेल्या घटनेबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे हे करत आहे.