Kalyan Crime News : कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
कल्याण :- शहरातील घराचे बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोंडून अज्ञात चोरट्याने चार लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, तिसगाव पाडा, कल्याण पूर्व येथे रिअल इस्टेट व्यवसाय Real Estate असलेल्या सुमित नामदेव गायकवाड (33 वर्ष) यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात Kalyan Kolsewadi Police Station चोरी संदर्भात तक्रार दाखल केली आहे. 8 ऑगस्ट च्या दुपारच्या दरम्यान फिर्यादी गायकवाड कामानिमित्त घराबाहेर गेले होते, घरात कोणच नसल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा ताळा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 75 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी पळून नेला आहे. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305,331(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत ढोले करत आहे. Kalyan Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…