Kalyan Facebook Social Media Fraud News : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; फेसबुकवरील जाहिरातीवरुन शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये महिला ऑनलाइन भुरट्यांच्या तावडीत,2.5 लाख बँकेतून खाली
कल्याण :- सोशल मीडिया म्हणजेच Social Media Fraud फेसबुकवर शेअर मार्केट Facebook Share Market Fraud मधील गुंतवणूक संदर्भातील जाहिरात महिलेला चांगलीच महागात पडली आहे. महिलेचे ऑनलाइन गुंतवणुकीमध्ये ऑनलाइन भुरट्यांनी 2.5 लाखांची फसवणूक झाल्याची घटना कल्याणच्या कोळसेवाडी पोलीसांच्या समोर आली आहे. Kalyan Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, 34 वर्षीय महिला कल्याण पूर्वेच्या विजय नगर परिसरात राहत आहे. या महिलेला फेसबुक वर शेअर मार्केट ट्रेडिंग बाबत जाहिरात पाठवण्यात आली होती. तसेच एक लिंकही पाठवण्यात आली होती.त्यानंतर लिंक वर क्लिक केले असता त्यांना व्हाट्सअप च्या ग्रुप मध्ये ॲड करण्यात आले. महिलेला KS MIN हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या ॲप मधून शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्री केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. महिलेने 2.5 लाखांची गुंतवणूक केली तसेच फिर्यादी महिलेने ऑनलाईन वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविले. परंतु बराच कालावधी झाल्यानंतर आपल्याला कोणताही परतावां न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येताच महिलेने कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात kolshewadi Police Station News तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (क),66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम हे करत आहे. Kalyan Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…