क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kalyan Crime News : हॉस्पिटलच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याचा 70 लाखांचा ‘चुना’!

Kalyan Latest Fraud News : पन्नास खाटांच्या रुग्णालयात मेडिकल स्टोअर देण्याचे आमिष; डॉक्टर आणि फार्मासिस्टची फसवणूक

कल्याण :- कल्याणमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याने पन्नास खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याच्या नावाखाली एका डॉक्टर आणि फार्मासिस्टची तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात Khadakpada Police Station गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी दाम्पत्य फरार आहे. Kalyan Latest Crime News

नेमकं काय घडलं?

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणारे डॉ. प्रसाद साळी आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी कल्याण पश्चिमेकडील आयकॉन बिल्डिंगमध्ये 50 खाटांचे रुग्णालय सुरू करणार असल्याचे आमिष दिले. मे 2024 मध्ये त्यांनी डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांना हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर देण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने त्यांनी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी 80 लाख रुपयांची मागणी केली.

खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी दाम्पत्य फरार

डॉ. दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांनी साळी दाम्पत्याला चेकद्वारे 70 लाख रुपये दिले. आरोपींनी तीन महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र एक वर्ष उलटूनही रुग्णालयाचे काम सुरू झाले नाही आणि त्यांनी पैसेही परत केले नाहीत.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. राहुल दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात लेखी करार आणि इतर कागदपत्रांसह तक्रार दाखल केली. “साळी दाम्पत्याने हॉस्पिटल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, ज्याची मालकी त्यांच्याकडे होती. आम्ही त्यांना सत्तर लाख रुपये दिले, पण 14 महिने उलटूनही आम्हाला पैसे परत मिळाले नाहीत,” अशी माहिती डॉ. राहुल दुबे यांनी दिली.

पोलिसांनी डॉ. प्रसाद साळी आणि वैशाली साळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट किंवा पॅथॉलॉजिस्ट यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्टने पोलिसांना लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0