•खडेगोळवली भागात तीन तरुणांचे कृत्य; डिलिव्हरी बाॅय गंभीर जखमी, श्वास घेण्यास होतोय त्रास
कल्याण :- कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागामध्ये एका डिलिव्हरी बाॅयला याच परिसरातील तीन तरुणांनी किरकोळ वादातून जीवघेणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यावरून झालेल्या या वादात बांबूच्या काठीचा फटका बसल्याने या तरुणाच्या नाकाचे हाड तुटले असून, त्याला श्वासोच्छ्वास घेताना त्रास होत आहे.
नेमकी घटना काय?
इंद्रजित रवींद्रसिंह संधू (19) असे मारहाण झालेल्या वस्तू वितरक मुलाचे नाव आहे, जो खडेगोळवलीतील गजानन आयकॉन इमारतीत राहतो. ही घटना सोमवारी (ऑक्टोबर 2025) रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास खडेगोळवलीतील मानवता रुग्णालयाजवळील डाॅमिनोज पिझ्झाजवळ घडली.
इंद्रजित संधू आपले काम संपवून आपल्या सहकाऱ्यांसह डाॅमिनोज पिझ्झामध्ये जात होता. त्यावेळी दुकानाच्या बाजूला कार्तिक कांबळे, प्रशांत नाईक आणि सुमित आत्राम नावाचे तीन तरुण उभे होते. संधू आणि त्याचे मित्र दुकानात जात असताना, प्रशांत नाईक, कार्तिक कांबळे आणि सुमित आत्राम यांनी त्यांच्या मोबाईलमधून चित्रीकरण सुरू केले.
व्हिडिओ काढण्यावरून वाद आणि मारहाण
चित्रीकरण पाहून इंद्रजित संधूने त्यांना “तुम्ही आमचे चित्रीकरण का करता,” असा प्रश्न विचारला. यावर प्रशांत नाईकने “तू मला असे विचारणारा कोण,” असे म्हणत इंद्रजितशी हुज्जत घालायला सुरुवात केली आणि शिवीगाळ करत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
इंद्रजितच्या बचावासाठी त्याचे मित्र साहिल आणि हर्षल पुढे आले. हर्षलच्या हातात श्वान हाकलण्याची एक बांबूची लहान काठी होती. प्रशांतने ती काठी हर्षलच्या हातून हिसकावून घेतली आणि त्याच काठीने इंद्रजितला बेदम मारहाण सुरू केली.
नाकाचे हाड तुटले
मारहाण सुरू असताना प्रशांत नाईकने बांबूच्या काठीचा एक जोरदार फटका इंद्रजित संधूच्या नाकावर मारला. या फटक्यामुळे इंद्रजितच्या नाकाचे हाड तुटले आणि नाक तसेच तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. गंभीर मारहाणीनंतर हे तिन्ही तरुण घटनास्थळावरून पळून गेले.
इंद्रजितला तातडीने उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता, त्याच्या नाकाचे हाड तुटल्याचे स्पष्ट झाले. या मारहाणीत त्याचा एक दात तुटला असून, दोन दातांनाही इजा झाली आहे. इंद्रजितला सध्या श्वास घेण्यास त्रास होत आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…