•देशभरात एकाचवेळी 10 ठिकाणी छापे; फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
कल्याण | सायबर फसवणूक करणाऱ्या रॅकेटला लगाम घालण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी मोहीम राबवली असून ‘ऑपरेशन चक्र’ अंतर्गत देशभरात 10 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत कल्याण येथून प्रतीक तनपुरे या संशयिताला अटक करण्यात आली असून तो सायबर आर्थिक फसवणुकीत सक्रिय सहभाग घेत होता, अशी माहिती सीबीआयने दिली.
सीबीआयच्या पथकाने दिल्ली, लखनऊ, हिसार, मुंबई, पुणे आणि नाशिकसह विविध ठिकाणी छापे टाकले. कल्याणमध्ये अटक करण्यात आलेला तनपुरे हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडण्यास मदत करीत होता. या बँक खात्यांचा वापर फसवणुकीतील रक्कम वळवण्यासाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल डेटा आणि आर्थिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
या टोळीने व्हॉट्सॲप ग्रुप्स, बनावट मोबाईल ॲप्स आणि नावाजलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवर सवलतीचे आमिष दाखवून नागरिकांचा विश्वास संपादन केला. अनेक गुंतवणूकदारांनी आपली रक्कम ‘गुंतवणूक’ म्हणून टाकली. मात्र, नंतर ती रक्कम गैरवापरासाठी वापरण्यात आली. यामध्ये टोळीने अत्यंत नियोजित आणि गुंतागुंतीचा आर्थिक व्यवहार करत मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…