Kalyan Crime News : पुर्व वैमनस्यातून खुनाचा प्रयत्न
•मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल
कल्याण :- पुर्वीच्या भांडणाचा राग धरून दोन आरोपींनी आपल्या साथीदार सोबत फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या डोक्यावर हातावर आणि तोंडावर वार करून गंभीर जखमी करूनआरोपींनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचा पुढील तपास चालू आहे. Kalyan Crime News
07 मार्च 2024 रोजी रात्री 9.15 वाजेच्या दरम्यान रेणुका फॅब्रिकेशन वर्क्स, श्रेया पार्क बिल्डिंग कल्याण पूर्व येथे अर्जुन गजानन काळबांडे (26 वर्षे) आणि सागर मुर्तीला ऊर्फ अण्णा हेल्पर चे काम करत असून यांचा आरोपी अनिकेत संजय देवरे (24 वर्षे), राज राकेश तिवारी (23 वर्षे) आणि त्यांच्या चार साथीदारांनी मिळून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या डोक्यावर हातावर तोंडावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेनंतर फिर्यादी यांनी आरोपींच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या तक्रारीवरून
आरोपींविरूध्द गुन्हा भा.द.वि. कलम 307,143,147,149,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन,आरोपी क्र. 1 व 2 यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप हे करीत आहेत. Kalyan Crime News