महाराष्ट्र
Trending

Kalyan Crime News : कल्याण जवळ मोबाईल चोरून पळाला, 18 वर्षीय तरूण नागरिकांच्या तावडीत!

Kalyan Latest Crime News : मोहने बाजारपेठेत भरदिवसा घडला प्रकार; ‘व्हॉट्सॲप’वर कागदपत्रे मागवण्याचा बहाणा, महिलेच्या मोबाईलवर मारला डल्ला

कल्याण :- कल्याणजवळच्या आंबिवली येथील मोहने बाजारपेठेत गुरूवारी भरदिवसा एका 18 वर्षीय तरुणाने एका महिलेकडून मोबाईल घेऊन पळ काढला. मात्र, प्रसंगावधान राखत महिलेने ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा केल्याने जागरूक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. Kalyan Latest Crime News

नेमकं काय घडलं?

कल्याणजवळच्या मोहने बाजारपेठेतील सर्व सेवा केंद्राजवळ सत्यभामा अच्छेलाल जैसवाल (वय 50) आपल्या कामासाठी आल्या होत्या. त्याचवेळी उल्फान हाकीमदीन मोहम्मद (वय 18) नावाचा एक तरुण तिथे आला. तो मूळचा उत्तरप्रदेशचा असून त्याला मोहने बाजारपेठेत गाळा भाड्याने हवा असल्याचे त्याने सांगितले.

गाळ्याच्या व्यवहारासाठी बोलणी सुरू असताना, उल्फानने गावाहून कागदपत्रे मागवण्यासाठी मोबाईल नसल्याचे सांगितले. सत्यभामा यांनी त्यांच्या हातातील मोबाईल दिला. उल्फान मोबाईलवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कागदपत्रे मागवण्याचा बहाणा करत होता. संधी मिळताच त्याने मोबाईल घेऊन धूम ठोकली.

सत्यभामा यांनी तात्काळ ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा करत त्याचा पाठलाग सुरू केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरील पादचाऱ्यांनीही उल्फानचा पाठलाग सुरू केला. स्वतःला पकडले जात असल्याचे पाहून उल्फानने पादचाऱ्यांसोबत झटापट करून पळण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांनी त्याला पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिल्यानंतर खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

खडकपाडा पोलिसांनी उल्फान मोहम्मदवर गुन्हा दाखल केला असून, त्याने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का, याचा तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0