Kalyan Crime News : सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक, तब्बल 70 गुन्ह्यांचा गुन्हे शाखेच्या युनिट-3 कडून छडा
Kalyan Crime Branch Unit Arrested Robbers : कल्याण : गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या ईराणी आरोपींना पकडले आहे.
कल्याण :- गुन्हे शाखेच्या युनिट Crime Branch Unit तीनच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या ईराणी आरोपीला पकडले आहे. त्याच्याकडून तब्बल 70 गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
ठाणे शहरातील भिवंडी, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ,कल्याण, शिळडायघर परिसरातील महिलांच्या आणि पुरुषांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, खेचून चोरी करणाऱ्यांना कल्याण गुन्हे शाखा घटक तीन यांनी जेरबंद केले आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या बी एन एस 2023 चे कलम 309(4),3(5) या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक तीन कल्याण यांच्याकडून घेत असताना पुण्यातील व ठाणे शहरातील विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयित आरोपी हे आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-3 यांच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा रचून चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 51 तोळे सोन्याचे दागिने 24 मोबाईल फोन आणि सहा मोटरसायकल आणि एक मारुती स्विफ्ट असे एकूण 50 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी आरोपींवर असलेले 70 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. आरोपींच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तब्बल 40 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपींची नावे
1.तौफीक तेजीब हुसेन (वय 29 रा.इंदिरानगर, वाल्मिकी शाळेसमोर, आंबिवली पश्चिम)
2.मोहम्मद अली उर्फ कालीचरण झेवेरी अली (वय 36, रा.चिंदरी रोड, बदुरूदीन कॉलनी, बिदर, कनार्टक)
3.अब्बास सल्लु जाफरी (वय 27 रा.भास्कर शाळेच्या जवळ, पाटील नगर आबिवंली कल्याण पश्चिम)
4.सुरज उर्फ छोटया मनोज सांळूखे, (वय 19 रा.पाटील बाबाचा बेडा परिसर, पाटील नगर, बेडयाचा पाडा, आंबिवली पश्चिम, कल्याण, जि.ठाणे)
पोलीस पथक
आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, पंजाबराव उगले,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ,शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (शोध 1) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस अमलंदार दत्ताराम भोसले, विलास कडु, अनुप कामत, प्रशात वानखेडे, गोरखनाथ पोटे, किशोर पाटील, उल्हास खंडारे, अदिक जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद बन्ने, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, रविंद्र लांडगे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मिनाक्षी खेडेकर, मंगल गावित यांनी केलेली आहे.