•Kalyan Crime News : रिक्षाचालकाकडून रिक्षा चालकावर प्राण घातक हल्ला, हल्ल्यानंतर रिक्षा चालक गंभीर जखमी, गळ्यावर आणि कानावर तीक्ष्ण हत्याराने वार
कल्याण :- रिक्षा चालकांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील चक्क एका रिक्षावाल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण केली तत्पूर्वी अनेक वेळा प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यावर भाड्यावरून वाद होत असतात. अशातच आता कल्याण पश्चिम येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या दोन रिक्षा मध्ये भांडण झाले. दोन दिवसांपूर्वी झालेला भांडणाचा राग मनात धरून एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकावर गळ्याखाली आणि कानाखाली तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जखमी केले तसेच त्याला जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न केला होता.
आरोपी रमेश मोतीराम ससाने (40 वर्ष), याने अनिल सदाशिव मुजमले (32 वर्ष) याच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. हे दोघेही रिक्षा चालक असून दोन दिवसांपूर्वी यांच्यात भांडण झाले होते. हे दोन्ही रिक्षा चालक कल्याण पश्चिमच्या इंदिरानगर परिसरात राहणारे आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रिक्षा चालक अनिल मुजमले याच्या गळ्यावर आणि कानावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले आहे. जखमी अनिल याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून झालेल्या घटनेबाबत अनिल याच्या भावाने म्हणजेच सुनीलने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुनीलने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील हे करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…