मुंबई

Kalyan Crime News : सोने – चांदी आणि रोख रक्कमेसह 6.76 लाखांचा ऐवज घेऊन चोरटा पसार

•अज्ञात चोरट्याने कुलुप शतोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील महागड्या वस्तू चोरल्या

कल्याण :- कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेच्या घरी दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी चोरी झाली आहे. चोरट्यांनी घराचे लॉक तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असे एकूण 6 लाख 76 हजाराचा ऐवज घेऊन चोरटे लंपास झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घरी 29 ऑगस्ट च्या दरम्यान भरदिवसा चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. महिला आणि तिचे कुटुंबं कामानिमित्त बाहेर गेले असता या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे लॉक तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेल्या सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सहा लाख 76 हजार किंमतीचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले आहे. या सर्व प्रकरणावर महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केले आहे. पोलिसांना महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331 (3), 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0