Kalyan Crime News : कल्याणमध्ये 1 बांगलादेशी महिला पोलिसांच्या जाळ्यात !
•कल्याण मधून एका बांगलादेशी महिलेला बेकायदा वास्तव्य प्रकरणी ताब्यात घेतली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
कल्याण :- नवी मुंबई, पालघर, विरार वसई, मुंबई आणि त्यानंतर आता घुसखोर बांगलादेशीय नागरिकांनी आपला मोर्चा ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहराकडे वळवला आहे. बांगलादेशातून भारतात घुसखोरी करायचे आणि कमी दरात भाडेतत्त्वावर घर घेऊन या परिसरात राहीचे हा या बांगलादेशी लोकांचा पॅटर्न पडला आहे. गुन्हे शाखा घटक-4, उल्हासनगर पथकातील पोलीस हवालदार यांना एक बांगलादेशी महिलेला बेकायदा कल्याणमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी याप्रकरणी त्या महिलेला ताब्यात घेतले आहे. सलमा अख्तर शेख (27 वय मुळ रा. मदारीपूर जिल्हा शिक्की देश बांगलादेश) असे या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा घटक-4 उल्हासनगर पोलीस हवालदार सुरेश जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगा विहार कॉलनी म्हात्रे चाळ खडेगोळवली, कल्याण पूर्व येथे एक महिला अनधिकृतपणे भारतात राहत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच, ही महिला बांगलादेशी असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी एक पथक तयार करून म्हात्रे चाळ येथे सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेतले. तसेच तिची सखोल चौकशी केली असता त्या महिलेकडे कोणत्याही प्रकारचे भारतीय वास्तव्य असल्याचे कागदपत्र नव्हते. ती महिला भारत-बांगलादेश सीमेवरून लपतछपत भारतात प्रवेश केला आणि ती महिला कोळसेवाडी हद्दीत विनापरवाना राहत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहेत. महिलेच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3, 4 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 13,14 अ,(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस पथक पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक -4, उल्हासनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस हवालदार सुरेश जाधव,सतिश सपकाळे, महिला पोलीस नाईक कुसुम शिंदे, पोलीस शिपाई प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले या पथकाने केलेली आहे.