कल्याण: सोनसाखळी चोरी करणाऱ्या कारचालकाला अटक
Kalyan Chain Snatching Criminal Arrested: कोळसेवाडी पोलीस क्षेत्रात सोन साखळी चोरी झाली आहे. काही तासात आरोपीचा पोलिसांनी घेतला शोध, आरोपीची चक्क कारमधून सोन साखळी चोरी
कल्याण :- कल्याण कोळशेवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क कार मधून सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरलेली तीन तोळ्याची सोन्याची चैन पोलिसांनी Kalyan Police जप्त केली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 309(4) प्रमाणे 14 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांच्या गळ्यातील तीन तोळ्याच्या वजनाची सोन्याची चैन एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील चालकाने जबरीने चोरून नेल्याची तक्रार दाखल झाले होती. घटना घडल्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील kolshewadi Police Station तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेचे तपासणीतून गुन्ह्यांमधील कार निष्पन्न करून त्यातील आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केले आहे.
पोलीस पथक
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुर्यकांत जगदाळे कल्याण यांचे मार्गदर्शनात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम,पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश न्ह्यायदे,पोलीस निरीक्षक प्रशासन नाईक कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव पोलीस उपनिरीक्षक मदने व डीबी पथकाचे पोलीस हवालदार कदम, भामरे,जाधव,बुधवंत पोलीस शिपाई सोनवणे यांनी केलेली आहे.