मुंबई

Kalyan Bus Accident : बसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

•बिर्ला कॉलेज रोड परिसरात अपघाती मृत्यूची घटना, बसचालकाच्या चुकीमुळे बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

कल्याण :- बिर्ला कॉलेज रोडवरील कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या केटीएमटी बसमुळे एका दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला घटना समोर आली आहे.

घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. प्रत्यक्ष दर्शकांनी पाहिल्यानुसार दुचाकीवरून तरुण जात असताना बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून, साधारणतः 12.00 वाजले च्या सुमारास ही घटना घडली आहे.

vivek

Recent Posts