क्राईम न्यूजमुंबई
Trending

Kalyan Bhiwandi Crime News : कल्याण-भिवंडीत गांजा आणि गुटखा तस्करीचा पर्दाफाश; पाच तस्कर जेरबंद

Kalyan Latest Crime News : 14 लाखांचा गांजा व गुटखा जप्त; लोहमार्ग व नारपोली पोलिसांची संयुक्त कारवाई

कल्याण | कल्याण आणि भिवंडी परिसरात प्रतिबंधित गांजा व गुटख्याची तस्करी करणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी अटक करून एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Kalyan Latest Crime News कल्याण रेल्वे गुन्हे शाखा व भिवंडीतील नारपोली पोलिसांनी Mumbai Bhiwandi Narpoli Police Station वेगवेगळ्या कारवायांद्वारे ही धडक कारवाई केली. तस्करांकडून जप्त करण्यात आलेला गांजा आणि गुटखा, सार्वजनिक आरोग्यासाठी घातक ठरू शकणारा असून, सर्व आरोपी बेरोजगार असल्याचे तपासात समोर आले आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातीलKalyan Railway Police Station स्कायवॉकवर पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्या मोहम्मद बेलाल शकील अहमद कुरेशी (30 वय) व पंकज रामअवतार पंडित (19 वय) या दोन तरुणांना ताब्यात घेतले. मोहम्मद कुरेशी भिवंडीतील वफा गृहसंकुलात, तर पंडित गणेश शेठ चाळ, शिवाजी चौक, खारीपार येथे राहतो. या दोघांकडून सुमारे एक लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी कारवाई भिवंडीतील नारपोली पोलिसांनी केली. गस्तीदरम्यान कामतघर भागात उभी असलेली संशयास्पद मोटार तपासली असता, तिच्यात 21 किलो वजनाचा गांजा आढळून आला. गांजाची 10 पिशव्यांमध्ये गट्टी बांधून वाहतूक केली जात होती. पोलिसांनी गणेश अर्जुन पावरा (29 वय), राकेश छत्तरसिंग पावरा (25 वय) आणि रवींद्र गनेदास बोरला (25 वय) या तिघांना ताब्यात घेतले. हे आरोपी अनुक्रमे धुळे आणि मध्यप्रदेशातील लहान गावांतील रहिवासी आहेत.

जप्त गांजाची बाजारमूल्य सुमारे 13 लाख 50 हजार रुपये असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी हवालदार अजित गुंजाळ यांच्या तक्रारीवरून अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक आकाश पवार करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0