•कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला; बोटे छाटल्याने राज्यभरात खळबळ
ठाणे | ठाणे महापालिकेच्या तत्कालीन साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर 2021 मध्ये चाकूने हल्ला करणाऱ्या फेरीवाला अमरजितसिंह यादव याला ठाणे न्यायालयाने दोषी ठरवले असून त्याला 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. हा हल्ला इतका गंभीर होता की पिंपळे यांची बोटे छाटली गेली होती, आणि त्यांचा अंगरक्षकही गंभीर जखमी झाला होता.
ही घटना ऑगस्ट 2021 मध्ये घडली होती, जेव्हा पिंपळे आपल्या पथकासह कासारवडवली परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. हल्लेखोर भाजीविक्रेता यादवने अचानक चाकूने प्राणघातक हल्ला करत कल्पिता पिंपळे व अंगरक्षक सोमनाथ पालवे यांना जखमी केले. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली, आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली होती.
खटल्यात ॲड. शिशिर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. 21 साक्षीदार तपासण्यात आले, आणि हल्लेखोराचा उद्देश हत्या करण्याचाच होता, हे सिद्ध करण्यात आले. हल्ल्यानंतरही यादवने धमक्या दिल्याचे न्यायालयास सांगण्यात आले.
न्यायाधीश ए. एस. भागवत यांनी सर्व पुरावे ग्राह्य धरून यादवला दोषी ठरवत 7 वर्षांची शिक्षा सुनावली. या निकालामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची पुनर्स्थापना होत असल्याचा संदेश मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…