कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना हद्दपार
कळंब (प्रतिनिधी) दि.०३/०४/२०२४ रोजी धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना हद्दपार केले
सविस्तर वृत्त असे की कळंब पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे
01) अतुल आबासाहेब कोल्हे रा.हावरगाव ता. कळंब
02) शिवराज रामहरी लोकरे रा खेर्डा ता. कळंब
03) उमेश महादेव लोकरे रे. खेर्डा ता. कळंब
यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन कळंब येथे विविध कलमानुसार गुन्हे दाखल असल्याने आगामी लोकसभा निवडणूक संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे हद्दपारी करीता मा. SDM साहेब कळंब यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यावर सुनावणी होवुन त्यांना प्रत्येकी 03 महिन्यापर्यंत धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सदरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवि सानप, सहा. पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामहरी चाटे, पोहेकाॅ प्रशांत सोनटक्के, परमेश्वर जाधव, पोना शिवाजी राऊत यांनी केली आहे.