Kalidas Kolambkar : मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतो की… राज्यपाल यांनी दिली कालिदास कोळंबकर यांना शपथ
•हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी घेतली शपथ!
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ ग्रहण गेली आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही किंवा कोणत्याही आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली नाही. तत्पूर्वी राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना हंगामी विधानसभा अध्यक्षाची शपथ दिली आहे. मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष पदी शपथ घेतो की… असे म्हणत कालिदास कोळंबकर यांनी राजभावनात विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.
कालिदास कोळंबकर हे यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे सगल 9 वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी स्वतःच्या नावावर केलाय. सन 1990 पासून 2004 पर्यंत त्यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, 2005 मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह त्यानीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नारायण राणे यांच्या अतिशय स्नेही म्हणून कालिदास कोळंबकर यांना मानले जाते. काँग्रेस नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपामधून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
ज्येष्ठ आमदार म्हणून भाजपच्या कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष पद भूषवणार आहेत. पुढील तीन दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्ष पदाची जबाबदारी राहील. पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांना ते शपथ देतील. 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होईल. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल.