कळंब(प्रतिनिधी)
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.
कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे सविसावे वर्ष असून यासाठी, एनडीटीव्ही मराठी मुंबईच्या असोसिएट एडिटर डॉक्टर कविता राणे , माध्यम व जनसंपर्क तज्ञ सचिन साळुंखे, प्रसिद्ध पत्रकार , लेखक धर्मराज हल्लाळे, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख,राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. अशोक दादा मोहेकर हे उपस्थित राहणार आहेत.
या दिवशी पुस्तक प्रकाशन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.
यांचा होणार गौरव…
विशाल परदेशी ( मुंबई,) चंद्रकांत करडे (बार्शी), सुभाष कुलकर्णी (तेर ),मोहन तलकोकुल (सोलापूर,), सुभाष घोडके( कळंब), शिवाजी सावंत (देव धानोरा ), अनिल क्षीरसागर (इटकुर ) यांचा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…