Jogeshwari Police Latest News : न्यायालयाने घोषित केले होते फरार; विलेपार्ले परिसरात सापळा रचून तडीपार पथकाने ठोकल्या बेड्या
मुंबई | मुंबईतील जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या Jogeshwari Police हद्दीत 1998 मध्ये घरफोडीच्या तब्बल 5 गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि गेल्या 28 वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अण्णादुराई उर्फ राजू करपन्ना देवंद्र (वय 55) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर हा आरोपी आपली ओळख लपवून वावरत होता. Jogeshwari Police Latest News
नेमके प्रकरण काय?
1998 मध्ये जोगेश्वरी पोलीस ठाण्यांतर्गत 5 वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांत अण्णादुराई याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली होती. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर तो गुन्ह्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाला नाही. वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला ‘फरार’ घोषित केले होते.
मुंबई पोलीस आयुक्तांनी फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या तडीपार पथकाने 28 वर्षे जुन्या अभिलेखावरील आरोपींचा शोध सुरू केला. 3 फेब्रुवारी 2026 रोजी हा आरोपी विलेपार्ले (पश्चिम) येथील नेहरू नगर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे जुहू पोलिसांच्या मदतीने सापळा रचून अण्णादुराईला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत तो 1198 मधील घरफोडीच्या 5 गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला फेरअटक करण्यात आली.
अटक केलेला आरोपी अण्णादुराई सध्या नालासोपारा (पश्चिम) येथील चार नंबर रोडवरील शनी मंदिराजवळ राहत असल्याचे समोर आले आहे.
या पथकाची कामगिरी
ही यशस्वी कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-पोलीस आयुक्त सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया, पोलीस उप-आयुक्त दत्ता नलावडे आणि सहा. पोलीस आयुक्त संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांच्या देखरेखीखाली तडीपार पथकाचे पोलीस उप-निरीक्षक हर्षल सूर्यवंशी, पोलीस शिपाई गौरव कदम आणि मंगेश मांडे यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…