Jogeshwari Latest Accident News : अपघातावेळी टँकर चालक फोनवर बोलत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप
मुंबई :- मुंबईतील जोगेश्वरी येथे एका भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या 63 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका पाण्याच्या टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्याने ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातावेळी टँकर चालक मोबाईलवर बोलत होता, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
सोमवारी, 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास जोगेश्वरी (पूर्व) येथील जे.ई.एस. शाळेसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. आशा जाधव (63 वय) या आपल्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर 19 वर्षांच्या पुतण्यासोबत दुचाकीवरून घरी परत येत होत्या.
मोबाईलवर बोलतांना झाला अपघात
त्यांच्या पुतण्याने, आदित्य जाधवने, पोलिसांना सांगितले की, “आम्ही रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या पाण्याच्या टँकरने आमच्या दुचाकीला धडक दिली. मी हॉर्न वाजवला, पण चालकाचे लक्ष रस्त्यावर नव्हते.” या धडकेमुळे आशा जाधव खाली पडल्या आणि टँकरचे पुढील चाक त्यांच्या डाव्या हातावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने आदित्यने त्यांना तातडीने जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले.
याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) आणि 281 नुसार निष्काळजीपणाने वाहन चालवून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…